मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (09:48 IST)

नवी मुंबईत कोरोनाचा स्फोट, शाळेतील 16 विद्यार्थ्यांना लागण

राज्यातील  नवी मुंबईतील घणसोली येथील शेतकरी  शाळेत कोरोनाचा स्फोट झाल्याची बातमी आहे. येथे इयत्ता 8वी ते 12वीच्या 16 मुलांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे या शाळेत 500 हून अधिक मुले शिकतात. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करायची आहे. या शाळेत परदेशातून आलेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकाचा मुलगा शिकतो. त्या मुलाची कोरोना चाचणी करण्यात आली .त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्या मुळे शाळेतील अन्य विद्यार्थ्यांची चाचणी केल्यावर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले . 
शाळेतील एकूण 16 विध्यार्थी पॉझिटिव्ह आल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहेत .
 
शुक्रवारी राज्यात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचे 8 नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक प्रभावित राज्य होते.
 
ओमिक्रॉनच्या 8 नवीन रुग्णांपैकी 6 पुण्यात आणि प्रत्येकी एक मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत आढळून आले आहेत.  अहवालानुसार राज्यात ओमिक्रॉनचे 8 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 6 रुग्ण पुण्यातील, 1 मुंबई आणि 1 कल्याण डोंबिवलीचा आहे.
 शुक्रवारी सापडलेल्या नवीन रुग्णांसह, राज्यात ओमिक्रॉन प्रकाराने बाधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे. पुण्यात सर्वाधिक 10 रुग्ण आढळले आहेत.