मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 29 मार्च 2020 (08:20 IST)

कोरोना : एसबीआयच्या खात्यात पैसे जमा करा!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार काटेकोर उपायोजना करत असून, या उपायोजनांमध्ये अनेक स्वंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंप्रेरणेने सहभागी होत आहेत.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीस मदत करत आहेत, तसेच मदत करू इच्छित आहेत. म्हणून मुख्यमंत्री साहायय्ता निधी- कोव्हिड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेटबँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंसेवी संस्था, धार्मिक संस्था या राज्य  सरकारच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात, त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधी-कोव्हिड 19 या नावाने सुरू करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, सदर देणग्यांना आकर अधिनियम 1961 च्या 80 (जी)नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा,  फोर्ट, मुंबई 400023 शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN  0000300 असे आहे.