गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (16:50 IST)

वाढत्या कोरोना संसर्गामुळे मोदी सरकारने 'हा' मोठा निर्णय घेतला

महाराष्ट्रासह देशातील १० राज्यात करोनाचा विळखा आधिक वाढला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दहा राज्यात घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाची वाढती लोकसंख्या पाहून हा निर्णय घेतला आहे. दहा राज्यातील ३८ जिल्ह्यात तातडीची चाचणी आणि आवश्यक ती निगराणी ठेवली जाणार असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. यामुळे संसर्ग आणि मृत्यू दर रोखण्यास मदत होईल, असा विश्वास मोदी सरकारला आहे.
 
आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विविध ४५ महापालिकांमधील जिल्हा रुग्णालय अधीक्षक यांच्यासोबत सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत प्रीती सुदान यांनी सांगितले की, ‘लॉकडाउन शिथिल केल्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह १० राज्यांनी येत्या काही महिन्यात जिल्हानिहाय नियोजन करावं. कंटेन्मेंट झोनमध्ये केसेसचं व्यवस्थापन आणि बफर झोनमध्ये काटेकोर निगराणी यावर लक्ष देण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.’
 
महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या १० राज्यातील ३८ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.