आता कोरोनाची तपासणी फक्त 30 मिनिटात आणि तेही कमी किमतीत, SGPGI ने नवे तंत्रज्ञान विकसित केले
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGI) च्या आण्विक औषध आणि जैव तंत्रज्ञान विभागाच्या (मॉलिक्यूलर मेडिसिन ऍड बायोटेक्नॉलॉजी ) वैज्ञानिकांनी कोरोनाच्या विषाणूंचे संसर्ग शोधण्यासाठी एक विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्यामध्ये तपासणी 30 मिनिटातच होणे शक्य असणार आणि खर्च देखील कमी होईल.
विभागप्रमुख स्वाती तिवारी यांनी सोमवारी सांगितले की, या RNA वर आधारित त्वरित चाचणी किटची किंमत 500 रुपये पेक्षा जास्त नसणार. तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी आवेदन करण्यात आले आहेत आणि जर SGPGI आणि ICMR कडून ह्याला मान्यता मिळाली तर ही सुविधा 3 ते 4 महिन्यात उपलब्ध होईल. त्यांनी सांगितले की हे तंत्र RNA वर आधारित आहे, म्हणजे रुग्णाच्या नमुन्यामधून आर एन ए काढून संक्रमण बघितले जातील.
आता पर्यंत परदेशातून आयात केलेल्या किट वर तपासणी सुरु आहेत. ज्यावर किमान 4 ते 5 हजारापर्यंत खर्च येतो आणि 3 ते 4 तास लागतात. पण या तंत्राच्या चाचणीमध्ये कमीत कमी खर्च होणार. तसेच वेळ देखील कमी लागेल. त्या म्हणाल्या की आरएनए आधारित ही प्रथमच किट आहे. तोंड किंवा नाकाच्या स्वॅब द्वारे ही चाचणी केली जाईल आणि डायग्नॉस्टिक लॅब मधील मशीनीद्वारेच याची चाचणी केली जाईल.
तिवारी म्हणतात की किटला मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी व्यावसायिक कंपन्या संपर्कात आहेत आणि तंत्रज्ञान हस्तांतरित होतातच किटच्या वैधतेसह आयसीएमआर कडे किट पाठविण्यात येणार. त्यानंतरच कंपन्या किटचे निर्माण करतील आणि सर्व चाचणी केंद्र या किटचे वापर करतील. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा या प्रकल्पाला लवकरात लवकर परवानगी मिळेल.