रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (14:46 IST)

कोरोना अपडेट : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले, भारतात AY.4.2 व्हेरियंटची प्रकरणे समोर आली

सध्या जगात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करत भारताने 100 कोटींहून अधिक लोकांना लस दिली आहे. त्यामुळे अनेकांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. मात्र, अद्याप 30 कोटींहून अधिक लोकांना लसीकरण करायचे आहे. दरम्यान, अहवाल असा दावा करत आहेत की काही देशांमध्ये कोरोना विषाणूचे नवीन आणि अधिक संसर्गजन्य व्हेरियंट ओळखले गेले आहेत, ज्यामुळे चिंता वाढली आहे.
 
 AY.4.2 नावाचा कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट सर्व प्रथम UK मध्ये ओळखला गेला होता, आता त्याच्या संसर्गाच्या बातम्या भारतातही समोर येत आहेत, जरी त्याची लागण झालेल्यांची संख्या खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे.
 
अनेक अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की कोरोनाचे हे नवीन रूप (AY.4.2) अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक असू शकते. भारत, यूके, अमेरिका, रशिया आणि इस्रायलसह 33 देशांमध्ये हा प्रकार आढळून आला आहे. जाणून घेऊया कोरोनाच्या या नवीन व्हेरियंट बद्दल.
 
भारतातही नवीन प्रकारांची प्रकरणे
 कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात चिंता वाढत आहे. सध्या भारतात AY.4.2 प्रकाराची प्रकरणे आढळून आली आहेत, जरी त्याची प्रकरणे सध्या 0.1 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. काही अहवालांमध्ये, या नवीन व्हेरियंटचे वर्णन अधिक घातक  म्हणून केले जात आहे, त्यामुळे त्याच्याशी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
 
 अनेक देशांमध्ये कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटविषयी माहिती असूनही, जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' किंवा 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' असे वर्गीकृत केलेले नाही.
 
शास्त्रज्ञ या नवीन व्हेरिएंट AY.4.2 बद्दल जाणून घेण्यासाठी अभ्यास करत आहेत नवीन व्हेरियंट कोरोना अत्यंत संसर्गजन्य आहे असे मानले जाते , की हा प्रकार डेल्टा व्हेरियंटचा एक प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, शास्त्रज्ञ  कोरोनाचे हे नवीन रूप अत्यंत धोकादायक मानत आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हा नवीन स्ट्रेन मूळ डेल्टा प्रकारापेक्षा सुमारे 10 टक्के जास्त संसर्गजन्य असू शकतो.
 
मानवी पेशींमध्ये सहज प्रवेश करू शकतो
आतापर्यंतच्या अभ्यासाच्या आधारे, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या या नवीन प्रकारात, AY.4.2 मध्ये काही म्युटेशन आहेत ज्यामुळे ते अधिक संसर्गजन्य होतात. डेल्टा व्हेरियंटच्या स्पाइक प्रोटीनमधील A222V आणि Y145H म्युटेशन या नवीन प्रकाराला जन्म देतात, ज्यामुळे ते मानवी पेशींमध्ये अधिक सहजपणे प्रवेश करू शकतात. लसीकरणामुळे निर्माण झालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेला ते फसविण्यास सक्षम आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अभ्यास केला जात आहे.
 
सध्या भारतात, कोरोनाचे नवीन प्रकार AY.4.2 चे काही प्रकरणे समोर आली आहेत, परंतु सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. 24 ऑक्टोबर रोजी देशात कोरोनाचे 14306 नवीन रुग्ण आढळले आहेत. लोकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारताने आतापर्यंत 100 कोटींहून अधिक लोकांना लसीकरण केले आहे. सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी सर्वांनी संपूर्ण खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.