गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जुलै 2022 (07:49 IST)

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ,२४ तासांत राज्यात ३ हजार १४२ इतक्या नव्या रूग्णांची नोंद

corona
राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार १४२ इतक्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात एकूण ३ हजार ९७४ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर हा १.८५ टक्के इतका आहे.
 
राज्यामध्ये ७८,२५,११४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.९० टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज एकूण १९ हजार ९८१ सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे ५६०० इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यात ३ हजार ३८४ सक्रिय रुग्ण आहेत.
 
बी ए.५ व्हेरीयंटचे ६ आणि बी ए. ४ चे तीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. या शिवाय बीए. २.७५ या व्हेरियंटचे राज्यात एकूण १० रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत.