गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 जुलै 2022 (10:37 IST)

मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही - पवार

bhagatsingh sharad panwar
शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सर्वच आमदारांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंबईत येऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली.
 
यावेळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. तसेच, दोन्ही नेत्यांना पेढाही भरवला. 
 
या पेढा भरवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
 
"जवळपास 1990 सालापर्यंत मी वेगवेगळ्या पदावर शपथा घेतल्या आहेत. पण आजपर्यंत मला कुठल्याही राज्यपालांनी पेढा भरवला नाही. यापूर्वी ज्यांनी शपथ घेतली, त्यांना फुलांचा गुच्छही देताना मी पाहिलं नाही. यावेळी त्यांनी दिला याचा आनंद आहे," असा टोला पवारांनी राज्यपालांना लगावला.