1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (21:23 IST)

राज्यपालांनी घाई-घाईनं मंजूर केलेल्या जीआरबाबत केली विचारणा

कोरोनावर मात केल्यानंतर राज्यपाल कोश्यारी कामावर रुजू होताच राज्यपालांनी ठाकरे सरकारला पहिला दणका दिला आहे. मागील सात दिवसांपासून अस्थिर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने अगदी काहीच दिवसात असंख्य जीआर मंजूर करुन घेतले. यावर राज्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेत राज्यपालांना यासंदर्भातील पत्र लिहीलं होतं. याची दखल राज्यपालांनी घेतली आहे.
 
राज्यपालांनी घाई-घाईनं मंजूर केलेल्या जीआरबाबत मुख्यमंत्री ठाकरेंना विचारणा केली आहे. २२ ते २४ जून या तीन दिवसांच्या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या सर्व जीआरची सविस्तर माहिती राज्यपालांनी मागवली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत राज्यपालांनी सूचना केल्या आहेत.