भारतात डिसेंबरपर्यंत कोरोना लसीचे ३० कोटी डोज बनणार
कोरोना विषाणूविरोधात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लस बनवण्यात आली आहे. या लसीची मानवी चाचणी घेतली जात आहे. शिवाय या चाचण्या यशस्वीदेखील होत आहेत. भारतातही या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या या लसीचे उत्पादन केले जात आहे. या लसी संदर्भात पुण्याच्या सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांच्याशी संवाद साधला असता. भारतात डिसेंबरपर्यंत या लसीचे ३० कोटी डोज बनवून तयार होतील असे त्यांनी म्हटले आहे.
भारतात या लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया येथे होत असून याचे सीईओ अदार पुनावाला यांनी सांगितले की, आम्ही मोठ्या प्रमाणात या लसीचे उत्पादन करत आहे. या आठवड्यात लस बनवण्याची परवानगी मिळवली जात आहे. तसेच डिसेंबरपर्यंत ऑक्सफर्ड वॅक्सिन Covishield चे ३० कोटी डोज बनवले जातील.