गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (22:34 IST)

हो, हवेतून कोरोनाचा विषाणूची बाधा होऊ शकते

Coronavirus can be airborne indoors
हवेतून कोरोनाचा विषाणूची बाधा होऊ शकते अशी भीती ३२ देशांमधल्या २३९ शास्त्रज्ञांनी तीन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. चिंतेची बाब म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनेही (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा WHO) यावर शिक्कामोर्तब केले आहे. संघटनेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये बंदिस्त जागांमध्ये गर्दीच्या ठिकाणी हवेच्या माध्यमातून कोरोना पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
 
अनेक घटनांचा अभ्यास केल्यानंतर WHO नं नमूद केलं आहे की, “काही ठिकाणचा कोरोनाचा उद्रेक बघता, बंदिस्त जागी गर्दी होत असेल तर हवेद्वारे अर्थातच ड्रॉपलेट्सच्या सोबतीनं कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.” रेस्टॉरंट्स, फिटनेस सेंटर्स, समूगानासारख्या जागा अशा घटनांमध्ये असा प्रसार झाल्याचं दिसून आल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.
 
बंदिस्त जागा, जिथं हवा पुरेशी खेळती नसते व अशा ठिकाणी गर्दी असेल व बराच काळासाठी कोरोनाबाधित व्यक्ती तिथं असेल तर हवेमधूनही इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं WHO नं नमूद केलं आहे.