covid 19 Update : कालच्या तुलनेत रुग्णांमध्ये 66 टक्क्यांनी वाढ, 40 मृत्यू, सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढवली आहे. आज पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2067 रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत 820 म्हणजेच 66 टक्क्यांनी जास्त आहे. यादरम्यान 40 जणांचा मृत्यू झाला. 1,547 लोकांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. देशातील सक्रिय रूग्णांची संख्या देखील 12,340 वर पोहोचली आहे जी चिंतेची बाब आहे. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 5,22,006 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, या कालावधीत एकूण 4,25,13,248 लोक स्वस्थ झाले आहेत.
एकूण प्रकरणे: 4,30,47,594
सक्रिय प्रकरणे: 12,340
एकूण रिकव्हरी : 4,25,13,248
एकूण मृत्यू: 5,22,006
एकूण लसीकरण: 1,86,90,56,607
दिल्लीत 632 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, राजधानीत राहणाऱ्या लोकांसाठी ही चिंतेची बाब आहे. मात्र, या काळात एकाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे. दुसरीकडे मुंबईबद्दल बोलायचे झाले तर 45 दिवसांनंतर येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 85 रुग्ण आढळले असून एकही मृत्यू झालेला नाही. दुसरीकडे, संपूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासात येथे कोरोनाचे 137 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर कोविड संसर्गामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोविडचे 660 सक्रिय रुग्ण आहेत.