मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 7 एप्रिल 2020 (15:52 IST)

क्रिकेट चाहत्यांना जुने सामने पाहता येणार

Cricket fans
भारतातील चाहत्यांना लाइव्ह क्रिकेट पाहायला आवडते, पण त्यांना जुन्या क्रिकेटच्या आठवणींमध्येही रमायला आवडते. हीच गोष्ट भारत सरकारने जाणली आहे. त्यामुळे  आता डीडी स्पोर्टस्‌ वाहिनीवर भारत सरकार आणि बीसीसीआय यांनी एकत्रित येऊन काही जुने सामने दाखवायचे ठरवले आहे. हे सामने 2000 सालच्या आसपासचे असतील, असेही म्हटले जात आहे.

सध्याच्या घडीला लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी  ही घोषणा भारत सरकार आणि बीसीसीआयने केली आहे.