1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (08:01 IST)

राज्यात नव्या रुग्णापेक्षा डिस्चार्ज दुप्पट, 49 रुग्णांचा मृत्यू

Discharge twice as many as new patients in the state
महाराष्ट्रात रविवारी नव्याने वाढ झालेल्या रुग्णापेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट आहे.रविवारी 3 हजार 413 नवीन कोरोना बाधित आढळून आले असून, 8 हजार 326 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 42 हजार 955 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 21 हजार 915 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 36 हजार 887 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.16 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 49 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 38 हजार 518 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत 5 कोटी 70 लाख 28 हजार 476 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 81 हजार 561 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 752 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.