शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2020 (16:55 IST)

कोरोनामुळे आमदाराचा मृत्यू , देशातली पहिलीच घटना

तामिळनाडूच्या डीएमकेचे आमदार जे. अनबालागन यांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर अनबालागन यांचा आजच ६२ वा वाढदिवस होता. 
 
डीएमकेचे आमदार जे. अनबालागन यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार; त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांची रविवारी तब्येत अधिकच खालावली होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बुधवारी त्यांचा सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.
 
दरम्यान, कोरोना संकट काळात लोकांना मदत करण्यासाठी आमदार जे. अनबालागन यांनी पुढाकार घेतला होता. तसेच त्यांनी पक्षाच्या ‘ओंदरीनाओव्हॉम कॅम्पेआग्र’मध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. कोरोनामुळे एखाद्या आमदाराच्या मृत्यूची ही पहिलीच घटना घडली आहे. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलीन यांनी जे. अनबासागन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.