गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (20:42 IST)

पार्लेजी बिस्कीटचा उत्पादनाचा आकडा विक्रमी

पार्लेजी या बिस्कीटने कोरोना काळात बिस्कीटांच्या उत्पादनाचा आकडा विक्रमीरित्या उंचावला आहे. पार्लेजी कंपनीतर्फे विक्रीची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली नसली, तरीही त्यांच्याकडून या विक्रमी विक्रीच्या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये मागील आठ दशकांतील सर्वाधिक विक्री झाल्यचं उघड होत आहे. 
 
'गेल्या काही काळात आमत्याकडे विक्रीचा दर एकूण ५ टक्के वाढला आहे. यामध्ये ८० ते ९० टक्के भाग हा पार्लेजीचा आहे. हे खरंतर अनपेक्षित होतं', असं पार्ले प्रोडक्ट्सचे विभाग प्रमुख मयांक शाह म्हणाल्याचं कळत आहे. 
 
संपूर्ण देशामध्ये पार्लेजीचे १३० कारखाने आहेत. ज्यापैकी १२० कारखान्यांमद्ये सातत्यानं या बिस्कीटांचं उत्पादन घेण्याचं काम सुरु आहे.