पारले जी चा तुटवडा, छोट्यातला छोटा बिस्किटाचा पुडाही मिळेना
पारले जी आता शहरासोबतच आता ग्रामीण भागातही आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. पारले जी छोट्यातला छोटा बिस्किटाचा पुडाही मिळेनासा झाला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सध्या पारले जी च्या कंपनीत उत्पादनात प्रक्रियेत काम करणारा अवघा ५० टक्के कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे उत्पादनावरही परिणाम झाला आहे. तर अनेक ठिकाणी पारले जी पॅकिंगसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने पॅकेजिंगच्या अडचणी येत आहेत. पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी वाहतुकीवर मर्यादा आल्यानेच त्याचा परिणाम संपुर्ण साखळीवर होत आहे. परिणाम बिस्किटांची निर्मिती होत असली तरीही त्याचे पॅकेजिंग करणे शक्य होत नाही अशी सद्यस्थिती आहे. याआधीच पारले जी कंपनीकडून तीन कोटी बिस्किटे तीन आठवड्यात सरकारी एजन्सीला देण्यात येणार आहेत असे जाहीर केले होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत होईल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले होते. पुरेसा बिस्किटचा साठा बाजारात उपलब्ध होईल असे कंपनीने स्पष्ट केले होते. पण मुंबई शहरासह आता ग्रामीण भागातही पारले जी मिळत नाही ही वास्तविकता आहे.