बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2020 (08:58 IST)

नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, नवे २२५९ रुग्ण दाखल

ज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत २२५९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी १०१५ रुग्ण मुंबईत सापडले आहेत. तर राज्यात दिवसभरामध्ये सुमारे १२० रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच तब्बल १६६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४२ हजार ६३८ झाली आहे.
 
राज्यात २२५९ नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९० हजार ७८७ झाली आहे. दिवसभरात १२० रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२८९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये ५१ हजार १०० कोरोनाचे रुग्ण सापडले असून, १७६० जणांचा मृत्यू झाला आहे.  राज्यात आतापर्यंत ४२ हजार ६३८ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या राज्यात ४४ हजार ८४९ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 
 
राज्यात आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या ५ लाख ७७ हजार ८११ नमुन्यांपैकी ९० हजार ७८७ नमुने पॉझिटिव्ह (१५.७१ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६८ हजार ०७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ९३० खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ४७० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.