1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 26 मार्च 2020 (16:25 IST)

उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना दिलासा! सिलिंडर मोफत

free gas
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या गरीब महिलांना दिलासा दिला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी ३० लाख महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत घरगुती गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.
 
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. त्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांना याचा फटका बसणार आहे. यासाठी केंद्र सरकारने मोठी मदत जाहीर केलीय. महिलांचाही यात विचार करण्यात आलाय. त्यांच्यासाठी केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी ३० लाख महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
 
तसेच, महिला जन-धन खातेधारकांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी दर महिन्याला ५०० रूपये सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत. यामुळं जवळपास २० कोटी महिला लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.