रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (17:54 IST)

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना: आवेदन कसे कराल, जाणून घ्या

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना केंद्रीय शासनाकडून राबविण्यात आली आहे. प्रधान मंत्री उज्जवला योजना (पीएमयुवाई) भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तरप्रदेशच्या बालिया इथे सुरु केली गेली. ही योजना दारिद्र्यरेषेच्या खालील परिवारासाठी कमीत कमी 3 वर्षात त्यांना एलपीजी चे कनेक्शन देण्याच्या लक्षासह सुरु केली गेली. 
 
ही योजना सर्व राज्यांसाठी राबवली आहे. या योजनेमार्फत केंद्र शासन दारिद्ररेषे खालील कुटुंबास (बीपीएल परिवार) एलपीजी कनेक्शन देणार. ह्याचे मुख्य उद्देश मुलां-बाळांना स्वयंपाक करताना घरात होणाऱ्या धुराचा त्रास होऊ नये आणि तसेच चुलीसाठी लागणाऱ्या लाकडासाठी वणवण भटकायला नको.
 
 
प्रधान मंत्री उज्ज्वला योजने साठी आवेदन :-
 
* दारिद्ररेषे खालील परिवाराची स्त्री नव्या कनेक्शनसाठी आवेदन करू शकते.
* केव्हायसी आवेदन देऊन 
* घराचा पत्ता, जनधन खाते, परिवारातील सदस्यांची आधार क्रमाकांचे पुरावे.
* आधार क्रमांक नसल्यास आधार संख्या देण्यात येईल.
 
आवेदन कुठे करावे:-
* आपल्या जवळच्या एलपीजी वितरकांकडे. 
 
या योजनेसाठी कोण पात्र आहे:-
* केव्हायसी वितरकांकडे जमा केल्यावर घरात कुठलेही गॅस कनेक्शन नाही याची खात्री पटल्यावर.
* आपले नाव डेटा सूची (एसइसीसी-2011 ) मध्ये असल्यास.
* परिवारातील सदस्यांची आधार क्रमांक असल्यास.