गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 2 मार्च 2020 (12:41 IST)

विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ५३ रुपयांनी स्वस्त

विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ५३ रुपयांनी स्वस्त झाला आहे. गेल्याच महिन्यात १५० रुपयांनी सिलिंडरमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे गृहिणींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता घरगुती वापराचा गॅस सिलिंडर  ५३ रुपयांनी स्वस्त झाल्याने महागाईत थोडासा दिलासा मिळाला आहे.
 
त्यामुळे ८९३.५० रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर (१४,२ किलोग्रॅम) मार्च महिन्यात ८४१ रुपयांना मिळणार आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर५३ रुपयांनी स्वस्त झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतींमुळे घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.