मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (09:40 IST)

पुणे, मुंबई, आणि नागपूर रुग्ण संख्येत पुढेच पूर्ण राज्य रिपोर्ट

राज्यात आत्तापर्यंत १३ हजार २८९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख २५ हजार ७७३ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५१ टक्के आहे. आज १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख १० हजार ९७८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
आत्तापर्यंत निदान झालेले १९,२१८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३७८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१९२९ (३५), ठाणे- ३०४ (६), ठाणे मनपा-२९४ (१), नवी  मुंबई मनपा-५०१ (४), कल्याण डोंबिवली मनपा-५५८ (८), उल्हासनगर मनपा-२४ (१), भिवंडी निजामपूर मनपा-२५ (१), मीरा भाईंदर मनपा-२२८(१), पालघर-१९१ (४), वसई-विरार मनपा-२०६ (३), रायगड-५१८ (२), पनवेल मनपा-३१३ (१), नाशिक-१४२ (४), नाशिक मनपा-७०९ (१२), मालेगाव मनपा-४ (१), अहमदनगर-६६२ (९),अहमदनगर मनपा-१४५ (१२), धुळे-२२८ (२), धुळे मनपा-११९, जळगाव- ६१७ (५), जळगाव मनपा-१२० (३), नंदूरबार-८३ (१), पुणे- ८५८ (४०), पुणे मनपा-१६८९ (३८), पिंपरी चिंचवड मनपा-१०५३ (१७), सोलापूर-४२० (७), सोलापूर मनपा-४३ (५), सातारा-६८१ (१२), कोल्हापूर-५१५ (३०), कोल्हापूर मनपा-१५९ (१०), सांगली-३६५ (१४), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३५६ (१०), सिंधुदूर्ग-१२९ (४), रत्नागिरी-८३ (४), औरंगाबाद-१९४ (२),औरंगाबाद मनपा-१४४ (३), जालना-१३७ (३), हिंगोली-४६ (१), परभणी-७०, परभणी मनपा-४९ (१), लातूर-२६८ (३), लातूर मनपा-१५७ (४), उस्मानाबाद-२१६ (१२), बीड-११० (६), नांदेड-२२९, नांदेड मनपा-१६४ (१), अकोला-४४, अकोला मनपा-१८ (१), अमरावती- ५८, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-२०० (३), बुलढाणा-१२१ (१), वाशिम-७८ (२), नागपूर-३४८ (२), नागपूर मनपा-१५०० (२४), वर्धा-११७, भंडारा-११४, गोंदिया-१३२, चंद्रपूर-१४७, चंद्रपूर मनपा-७३, गडचिरोली-१७, इतर राज्य- २१ (२).
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४४ लाख ४४ हजार २४९ नमुन्यांपैकी ८ लाख ६३ हजार ०६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.३२ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ५१ हजार ३४३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.