गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (13:12 IST)

Gangajal for corona treatment :काय सांगता, कोरोना च्या उपचारात गंगाजल प्रभावी ,बीएचयू तज्ञांनी दावा केला

Gangajal for corona treatment :कोरोना उपचारासाठी गंगाजल प्रभावी असल्याचा दावा, न्यूरोलॉजिस्ट डॉ व्हीएन मिश्रा आणि बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) चे डॉ अभिषेक पाठक यांनी  केला आहे.त्यांच्या मते कोविड -19 च्या उपचारात गंगेचे पाणी प्रभावी ठरू शकते. तज्ज्ञांनी पत्रकार परिषदेत सांगितले की हिमालयातील गंगोत्रीमधून बाहेर पडणाऱ्या गंगेत "बॅक्टेरियोफेज" मुबलक प्रमाणात आहे.
 
"बॅक्टेरियोफेज" शब्दाचा अर्थ "जीवाणू नष्ट करणारा" असा होतो. गंगा नदीत आढळणारे बॅक्टेरियोफेज बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव नष्ट करतात, ज्यामुळे गंगा नदीच्या पाण्याची शुद्धता राखली जाते. गंगा नदीमध्ये बॅक्टेरियोफेजच्या उपस्थितीबद्दल तज्ञांनी सांगितले की गंगेच्या पाण्यात सुमारे 1300 प्रकारच्या बॅक्टेरियोफेजची पुष्टी झाली आहे, जी इतर कोणत्याही नदीपेक्षा जास्त आहे.