मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (08:57 IST)

राज्यात रविवारी ३ हजार ६२३ नवीन करोनाबाधित आढळले

राज्यात रविवारी ३ हजार ६२३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २ हजार ९७२ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.याशिवाय, ४६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे.अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे.तर, दररोज आढळणारी करोना बाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०५,७८८ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे.
 
आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,९७,८७७ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३८१४२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५९,७९,८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,९७,८७७(११.६१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २,९८,२०७ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत, तर १ हजार ८९२ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.