कोरोना चाचणीसाठी गुळण्या केलेल्या पाण्याची चाचणी वापरता येणे शक्य
स्वॅबच्या असलेल्या जागेवर पाण्याच्या गुळण्या करून हे पाणीदेखील कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी वापरता येऊ शकते, असा निष्कर्ष भारतीय काऊंसिल ऑफ मे़डिकल रिसर्च (ICMR) यांनी काढला आहे. हा चाचणीसाठी सर्वात सोपा आणि चांगला पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा रितीने कोरोना चाचणी केल्यास नमुने गोळा करण्याकरता लागणार वेळ वाचेल. तसेच चाचणी अहवालही लवकर देता येतील.
नाकातील स्वॅब किंवा तोंडातील लाळ यांचे नमुने घेण्यापेक्षा गुळण्या केलेल्या पाण्याची चाचणी करणे अधिक सोपे होते. यामुळे चाचणी घेणाऱ्या तज्ज्ञांचा वेळ कितीतरी पटीने वाढू शकतो. जो इतर कामांमध्ये वापरता येईल. नुकतेच ICMR ने एका अभ्यासात या चाचणीसाठी हे नवीन संशोधन केले आहे. अशा प्रकारच्या चाचणीचा अहवाल इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे. ICMR ने केलेल्या अभ्यासानुसार गुळण्या केलेल्या पाण्याचे नमुने चाचणीसाठी दिल्यास त्याचा खर्चही कमी येऊ शकतो. त्यासाठी जास्त खबरदारीही घेण्याची गरज पडणार नाही. तसेच नाकाद्वारे स्वॅब घेण्यासाठी टेस्ट किटची गरजदेखील कमी भासेल.