शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (14:23 IST)

दिलासादायक बातमी ! कोरोना परिस्थिती आटोक्यात आली.

गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाने सर्वत्र उच्छाद मांडला आहे. दररोज लाखो हजारो लोक मृत्युमुखी झाले आहे.कोरोनाने देशाची आर्थिक व्यवस्था देखील कोलमडून टाकली आहे.सर्वत्र भयानक स्थितीमध्ये आता मात्र दिलासादायक बातमी येत आहे.
 
मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाचा उद्रेग करणारी ही दुसरी लाट आता आटोक्यात येत आहे. गेल्या तीन आठवड्याचा रुग्णांचा आकडा 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. मे मध्ये  कोरोनाचे 3 लाख 91 हजार 263 रुग्ण आढळून आले होते. 
 
शनिवारी 1 लाख 95 हजार 183 नवीन रुग्णांची नोंद झाली असून हा आकडा सरासरी 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. पहिल्या लाटेत 17 सप्टेंबरला सर्वात जास्त 93 हजार 735 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर 30 ऑक्टोबरला नव्या रुग्णांची संख्या निम्मी झाली होती.
 
कोरोनानं मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. गेल्या 7 दिवसात सरासरी मृतांचा आकडा पाहिल्यास तो 18 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 16 मे रोजी 4 हजार 40 रुग्णांचा मृत्यू कोरोनानं झाला होता. मात्र सध्या ही संख्या 3 हजार 324 च्या वर आहे.या दिलासादायक बातमीत एक चिंतेची बातमी म्हणजे की रुग्णांची आकडेवारीची संख्या कमी असून मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या 3 हजाराहून कमी होत नाही.शनिवारी 3 हजार 80 रुग्ण मृत्युमुखी झाले.