शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मार्च 2020 (10:16 IST)

हाँगकाँगमध्ये एका पाळी कुत्र्याला कोरोनाची लागण

कोरोना Corona COVID 19 व्हायरसमुळे  दहशत साऱ्या जगभरात पाहायला मिळत आहे. जिथे माणसांमध्ये कोरोनामुळे भीतीचं वातावरण आहे, तिथेच आता प्राण्यांमध्येही या विषाणूचा संसर्ग होत असल्याचं निरिक्षणात आढळलं आहे. 
 
हाँगकाँगमध्ये एका पाळी कुत्र्याला या व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त एएनाय या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एका ६०वर्षीय महिलेकडे असणाऱ्या पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. प्राण्यांमध्ये या व्हायरसची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. शिवाय माणसांच्या संपर्कात आल्यामुळे कुत्र्याला या व्हायरसची लागण झाल्यामुळे या घटनेने साऱ्या जगाचं लक्ष वेधलं आहे. 
 
संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ज्यानंतर तिच्याकडे असणाऱ्या कुत्र्यालाही या व्हायरसचा संसर्ग झाला. सध्याच्या घडीला या कुत्र्याला पशू वैद्यकिय केंद्रात उपचारांसाठी ठेवण्यात आलं आहे. 
 
एका पोमेरनियन कुत्र्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यावेळी त्याला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. या कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच आता हाँगकाँगमध्ये कुत्र्यांनाही वेगळं ठेवलं जाऊ लागलं आहे. शिवाय पोमेरनियन या प्रजातीच्या कुत्र्यांचीही तपासणी केली जात आहे.