मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शुक्रवार, 28 मे 2021 (19:49 IST)

DRDO चे कोरोनाचे औषध 2 DG कोरोनावर कशे प्रभावी आहे?किंमत काय असणार.

नवी दिल्ली. कोरोनाव्हायरसशी लढा देण्यासाठी भारत आज एक नवीन औषध बाजारात आणणार आहे. 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज किंवा 2 डीजी नावाची ही अँटी कोविड औषध डीआरडीओ वैज्ञानिकांनी तयार केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, डीआरडीओची अँटी कोविड ड्रग 2 डीजीची पहिली खेप सुरू केली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया हे या कार्यक्रमास उपस्थित होते. या औषधाबद्दल सर्व काही जाणून घ्या-
 
कोणी तयार केलेः 2 डीजी हे पहिले औषध आहे ज्यास अँटी-कोविड ड्रग म्हटले जाते. 2 डीजी हा ट्यूमर, कर्करोगाच्या पेशींवर उपचार करणार्‍या 2DG रेणूचा बदललेला प्रकार आहे. डीआरडीओच्या न्यूक्लियर मेडिसिन अ‍ॅण्ड अलाइड सायन्सेस इन्स्टिट्यूट (INMAS) ने डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांमध्ये सहकार्य केले आहे.
औषध कसे घ्यावे: वैद्यकीय संशोधना दरम्यान, 2-डीजी औषधाची 5 .85 ग्रॅम पाउच तयार केली गेली. त्याचे प्रत्येक पाउच सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात घोळून रुग्णांना दिले गेले. याचा चांगला परिणाम झाला आहे. ज्या रुग्णांना औषधे दिली गेली होती त्यांच्या मध्ये जलद रिकव्हरी दिसून आली. त्या आधारावर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.
 
हे कसे कार्य करेल: हे औषध मोठ्या प्रमाणात ग्लूकोजसारखे आहे, परंतु ग्लूकोज नाही. विषाणू शरीरावर पोहोचताच त्याच्या प्रती बनविण्यास सुरवात करते, यासाठी त्यास सामर्थ्याची आवश्यकता असते. जे ग्लूकोज मुळे मिळते. हे औषध दिल्यास,व्हायरस हे ग्लूकोज एनालॉग घेईल आणि त्यात अडकेल. याचा परिणाम असा होईल की व्हायरस स्वतःच्या प्रती तयार करू शकणार नाही, म्हणजेच त्याची वाढ थांबेल.
 
तीन-टप्प्यांच्या चाचणीत: प्रयोगशाळा प्रयोग, हैदराबाद येथील डीआरडीओ आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीच्या शास्त्रज्ञांना आढळले की त्याचे रेणू कोरोनव्हायरस विरूद्ध प्रभावी आहे आणि त्यांची वाढ रोखतो. पहिला भाग 6 रुग्णालयांमध्ये आणि दुसरा भाग 11 रुग्णालयांमध्ये वापरला गेला.
 
2020 च्या मे आणि ऑक्टोबर दरम्यान फेज 2 चाचणी दोन भागात  110 रुग्णांवर घेण्यात आली.गेल्या वर्षी डिसेंबर ते मार्च या कालावधीत देशातील 27 कोविड रुग्णालयांमधील 220 रुग्णांवर फेज तिसऱ्याची   क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. या चाचण्या दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडूमधील रुग्णालयात घेण्यात आल्या.
 
बाजारात औषध येईल का? : सध्या केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध रुग्णालयांमध्ये दिले जाईल. सध्या केवळ आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. हे औषध सामान्य वापरासाठी मंजूर होईपर्यंत बाजारात येणे शक्य नाही. सोमवारी आपत्कालीन वापरासाठी डीआरडीओच्या अँटी-कोरोना ड्रग 2 डीजीची 10,000 पॅकेट्स जारी केली जातील. हे रुग्णांना दिले जातील. हे औषध प्रथम दिल्लीतील डीआरडीओ कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना दिले जाईल.
 
किंमत किती असेल? : किंमतीबद्दल कोणताही खुलासा झालेला नाही. यासंदर्भात कोणताही निर्णय डॉ. रेड्डी यांच्या प्रयोगशाळेत घेतला जाईल  ते म्हणाले की हे औषध परवडण्यासारखे असले पाहिजे,याची  काळजी घेतली जाईल. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एका पाकिटाची किंमत 500 ते 600 रुपयांपर्यंत असू शकते.