बुस्टर डोस घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, बुस्टर डोस घेण्याचा कालावधी कमी केला
लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) शिफारशींनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार नऊ महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीपूर्वी बूस्टर शॉट घेण्याची परवानगी दिली आहे.म्हणजे आता बुस्टर डोस मधील अंतर 9 महिन्याहून कमी करून आता 90 दिवसांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "परदेशात प्रवास करणारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थी आता गंतव्य देशाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बुस्टरचे डोस घेऊ शकतात. ही नवीन सुविधा लवकरच CoWIN पोर्टलवर उपलब्ध होईल."
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, सल्लागार पॅनेलने शिफारस केली होती की ज्या लोकांना परदेशात प्रवास करण्याची आवश्यकता आहे त्यांनी अनिवार्य नऊ महिन्यांच्या अंतरापूर्वी ते प्रवास करत असलेल्या देशानुसार कोविड लसीचा बुस्टरचा डोस घेऊ शकतात.
सध्या, 18 वर्षांवरील सर्व लोक ज्यांनी दुसऱ्या डोसचे नऊ महिने पूर्ण केले आहेत ते बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र आहेत.
भारतात या वर्षी 10 जानेवारीपासून आरोग्य सेवा आणि फ्रंटलाइन कामगार आणि 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना COVID लसींचा सावधगिरीचा डोस देण्यास सुरुवात केली.
सध्या देशात अनेक राज्यात पुन्हा कोरोनाची प्रकरण वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .सध्या महाराष्ट्रात जरी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका असल्यामुळे सावधगिरी बाळगायला पाहिजे असं देखील ते म्हणाले .