गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2020 (20:38 IST)

काय म्हणता, इतर देशापेक्षा भारतात कोरोनाचा मृत्यूदर अधिक

जगातील इतर देशापेक्षा भारतात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला देशात कोरोना विषाणूची संख्या १०० वरुन १ हजारपर्यंत पोहोचण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागला. त्यामुळे कमी वेगाने कोरोनाची संख्या वाढणारा भारत देश हा दुसऱ्या क्रमांकाचा देश होता. पण दुर्दैवाने पुढील दिवस भारत अशीच कामगिरी करु शकला नाही. दरम्यान, इंडिया टुडे डेटा इंटेलिजेंस युनिटने जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेच्या दैनिक स्थिती अहवालाची छाननी केली असता १ हजारांचा आकडा पार केल्यानंतर भारताने ९ दिवसांच्या कालावधीत ५ हजार कोरोना रुग्णांचा आकडा पार केला आहे.
 
डब्ल्यूएचओ (WHO)च्या अहवालानुसार, भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजार ७१ होता. मात्र, ९ दिवसांनी ही आकडेवारी पाहिली असता यामध्ये पाचपट वाढ झाली असून हा आकडा ५ हजार २०० वर गेला आहे. ५ हजार केसेस येईपर्यंत मृतांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावरुन थेट आठव्या क्रमांकावर आला. तर अमेरिका, इराण, स्पेन आणि चीन या देशांसह कोरोना विषाणूने ग्रासलेल्या अनेक देश आहेत, ज्यामध्ये ५ हजार रुग्णांची संख्या होऊपर्यंत मृतांची संख्या कमी होती.
 
स्वीडन हा जगातील एक असा देश आहे जिथे ५ हाजरपर्यंत रुग्णांचा आकडा पोहोचेपर्यंत मृतांचा आकडा सर्वाधिक होता. ३ एप्रिल रोजी स्वीडनमध्ये कोरोना विषाणूची ५ हजार ४६६ पुष्टी झाली. तोपर्यंत, स्वीडनमध्ये २८२ मृत्यू होते.
 
नेदरलँड्स या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ५ हजार घटनांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण २७६ वर होते. स्वीडन आणि नेदरलँड्सनंतर इटली २३४, यूके २३३, बेल्जियम २२०, डेन्मार्क २०३ आणि ब्राझील २०७ या भागात आला.
 
त्यामुळे भारत आठव्या क्रमांकावर असून ५ हजार कोरोनाची प्रकरणे ओलांडल्यानंतर मृत्यूची संख्या १४९ वर गेली आहे. तर मृत्यूच्या बाबतीत फ्रान्स १४८, इराण १४५ स्पेन १३६ चीन १३२ आणि अमेरिका १०० आहे. ५ हजार रुग्णांच्या संख्येपर्यंत जर्मनीमध्ये मृत्यूची संख्या सर्वात कमी पोहोचली आहे. १७ मार्च रोजी जर्मनीमध्ये एकूण ६ हजार १२ पुष्टी झाल्याची नोंद झाली. परंतु तोपर्यंत केवळ १३ मृत्यू झाले होते.