बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 17 जून 2020 (07:48 IST)

ज्योतिरादित्य शिंदे यांची कोरोनावर यशस्वी मात

jyotiraditya scindia
भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते घरी परतले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याबाबत माहिती दिली.
 
ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवी राजे शिंदे यांना ९ जून रोजी करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले.  ज्योतिरादित्य शिंदे यांनी करोनावर मात केल्याचं समोर आलं असलं तरी अद्याप त्यांच्या आईची मात्र करोनाशी झुंज सुरूच आहे. त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती देताना, “देशाचे आणि राज्याचे लोकप्रिय नेता ज्योतिरादित्य शिंदे पूर्णतः बरे होऊन घरी परतले आहेत. ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यांच्या आईच्या प्रकृतीतही लवकर सुधारणा होवो हिच देवाकडे हात जोडून प्रार्थना”, अशा आशयाचं ट्विट शिवराज यांनी केलं आहे.