बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 23 एप्रिल 2020 (16:45 IST)

परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष गाड्या सोडा

परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून केली लआहे. कोरोनाचे संकट असल्याने केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत ३ मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर बांधव आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची व त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात, असे ते म्हणालेत.
 
 रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात. तसेच त्यासाठीचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्रात केल आहे. अजित पवार यांनी परप्रांतीय मजुरांच्या मुद्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची विनंती केली आहे.