रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:20 IST)

राज्यात कोरोनाच्या 14 हजार 372 नव्या रुग्णांची भर तर 1682 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त

covid
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. राज्यात मंगळवारी कोरोनाच्या 14 हजार 372 नव्या रुग्णांची भर पडली असून 94 जणांचा मृत्यू झाला आहे.तर  30 हजार 093 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
 
राज्यात एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही.आतापर्यंत 3221 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1682 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात 94 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.84 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 73 लाख 97 हजार 352 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.63 टक्के आहे. सध्या राज्यात 10 लाख 69 हजार 596 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2731 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 47 लाख 82 हजार 391 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे