1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मे 2020 (16:27 IST)

महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ४ कोटींचा दंड केला वसूल

Maharashtra Police
राज्यात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात धडक कारवाई करत महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ४ कोटींचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. 
 
लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळा. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, अनेकांनी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये १९ हजार ८३८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ५६ हजार ४७३ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.