बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: औरंगाबाद , सोमवार, 20 एप्रिल 2020 (11:04 IST)

तबलिगी पोस्ट; बबिताविरुद्ध महाराष्ट्रात गुन्हा

तबलिगी जमातबाबत वादग्रस्त पोस्ट करणारी भारताची महिला कुस्तीपटू बबिता  फोगाटविरोधात महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बबिताच्या पोस्टमुळे  समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे बबिता विरोधात औरंगाबाद शहर चौकातील पोलीस ठाण्यात   तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता बबिता या तक्रारीविरोधात नेमके काय पाऊल उचलते, याची उत्सुकता सर्वांना आहे. बबिताविरोधात तबलिगी जमातशी संबंधित एका व्यक्तीने औरंगाबाद येथे तक्रार दाखल केली आहे.
बबीताने काय पोस्ट केली होती
अर्जुन पुरस्कार विजेत्या बबीताने, करोना व्हायरस भारताची दुसरी मोठी समस्या आहे. तर 'तबलिगी जमात' ही अद्याप नंबर एकवर आहे. तिच्या या ट्विटवरून अनेकांनी विरोध करण्यास सुरुवात केली.