1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
  4. Minister of State Bachchu Kadu contracted corona for the second time

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Minister
राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. एकदा कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन करत काळजी घेण्यासाठी देखील सांगितलं आहे. 
 
बच्चू कडू ट्विट करत म्हणाले, 'माझी कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची घ्यावी. आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्या.'
पुढील लेख
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत आठ सदस्यांची वर्णी