सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (16:04 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विरोधकांवर टीका

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधला आहे. “साप तसे अजूनही आहेत. काही साप हे चावतात त्यामुळे त्यावर इलाज असतो. पण, असेही काही साप असतात जे वळवळ करतात त्यामुळे त्यांना योग्यवेळी ठेचायचे असते”, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली आहे.
 
‘राज्यात अनेक राजे होऊन गेले. हे राजे लढाई करताना तलवारींचा वापर करायचे. पण, छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळे ठरले कारण ते लढाई करताना केवळ तलवारीचा नाहीतर ढालेचाही वापर करायचे. त्यांनी आजपर्यंत अनेक लढाय्या जिंकल्या आहेत. त्यामुळे कोरोना हे ही एक युद्ध असून आपण देखील त्यांच्याप्रमाणे आता कोरोनावर मात करण्यासाठी मास्क या ढालेचा वापर करायचा आहे. कारण कोरोनावर मात करण्यासाठी मास्क हीच एक ढाल आहे’.