शिव संपर्क अभियानावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांची टीका
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिव संपर्क अभियान राबवण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले. शिवसेना घराघरात पोहोचवावी, असंही ठाकरे बैठकीत म्हणाले. शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
“घराघरात जाताय?जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत. त्यांना विचारायचे आहे… कोरोनाला घाबरून “घराघरात” लपून का बसला होतात?, मुख्यमंत्र्यांसह सगळे तुम्ही तेव्हा कुठे होतात?, एकही रुपयांची मदत का दिली नाहीत?, अवाजवी वाढीव वीज बिले पाठवून का छळताय?, बिल्डर, दारूवाले, टाटाना सवलतीची खैरात, मग समान्य मुंबईकरांना काय दिलेत?, समुद्राचे पाणी गोडे करायला निघालात पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय?, आता उपनगरात एनए टँक्स वसूली करुन पाकिटमारी का करताय?, असे बरेच हिशेब मुंबईकरांचे बाकी आहेत… त्यामुळे जाच तुम्ही घराघरात!,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.