बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 8 मे 2021 (22:36 IST)

राज्यात कोरोनाचे 53 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे 24 तासात 864 लोक मृत्युमुखी

शनिवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 53 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूची एकूण 53605 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याच वेळी, राज्यात या महामारीमुळे 864 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 50 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर राज्यात संक्रमित लोकांची एकूण संख्या आता 50 लाखांच्या पुढे जाऊन संख्या 50,53,336 पर्यंत पोहोचली आहे. 
तथापि, शनिवारी राज्यातील 82,266 लोक या कोरोना विषाणूला मात देऊन  बरे झाले ही आरामदायक बाब आहे. या आकडेवारीनुसार, राज्यात साथीच्या रोगाची सुरूवात झाल्यापासून 43,47,592 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर, चाचणीबद्दल बोलतांना, गेल्या 24 तासांत 2,60,751 चाचण्या घेण्यात आल्या.
त्याच बरोबर मुंबईत कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे दिवसेंदिवस घटत असल्याचे दिसून आले आहे. शनिवारी मुंबईत कोरोना विषाणूची 2664 प्रकरणे नोंदली गेली आणि 62 लोकांचा मृत्यूही झाला. आतापर्यंत मुंबईत कोरोना विषाणूची 6,73,235 प्रकरणे नोंदली गेली आहेत, आतापर्यंत 13,713 लोकांचा मृत्यूही झाला आहे.