शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (14:39 IST)

कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला जाणून घ्या

most effective
कोरोनाच्या (coronavirus) संकट काळात लोक विविध प्रकारे आपला बचाव करत आहेत. यामध्ये सॅनिटायझर, मास्क, प्लॅस्टिक शिल्ड आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्यात येत आहे. काही लोक कापडी, काही सर्जिकल तर काही N95 मास्कचा (mask) वापर करत आहे. मात्र यापैकी कोणता मास्क प्रभावी आहे, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. याबाबत संशोधन झालं आणि त्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी N95 मास्क सर्वांत प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.
 
मास्कबाबत कॅलिफोर्निया विद्यापीठात अभ्यास करण्यात आला. Medical Xpress मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. खोकला आणि शिंकेतून बाहेर पडणाऱ्या संसर्गजन्य शिंतोड्यांमुळे  हवेत विषाणूचा प्रसार होण्याचा धोका जास्त आहे आणि अशा पद्धतीने संसर्ग पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी सर्जिकल मास्क आणि  N95 मास्क जास्त प्रभावी आहे. N95 घातल्यानंतर शिंक आणि खोकल्यावाटे संसर्ग पसरण्याचा धोका 10 पटींनी कमी होतो.
 
तर कापडी मास्क वापरल्यानंतर रुग्णाच्या खोकल्यातून, शिंकेतून मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य विषाणू बाहेर पडतात असं संशोधकांच्या लक्षात आलं. त्याचबरोबर घरगुती मास्क  खोकल्याची गती आणि तीव्रता रोखण्यास सक्षम नसल्याचं दिसून आलं आहे. या मास्कमधून मोठ्या प्रमाणात विषाणू रोखले जात असले तरीदेखील हवेमध्ये मोठ्या प्रमाणात कपड्याच्या धाग्यांचे अंश पसरतात. त्यामुळे या सर्व मास्कच्या तुलनेत  N-95 सर्वांत प्रभावी असल्याचं सिद्ध होत आहे.
 
जगभरात कोरोनाच्या लशीवर संशोधन सुरू आहे. जोपर्यंत लस बाजारात येत नाही तोपर्यंत मास्क वापरणं सर्वांना बंधनकारक असणार आहे. मास्क केवळ कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करतं. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या शरीरातील विषाणू हवेत पसरण्यापासून आणि निरोगी व्यक्तीच्या शरीरात कोरोना विषाणू जाण्यापासून रोखतं. त्यामुळे कोरोनाव्हायरसपासून बचाव करायचा असेल तर  N-95 मास्क वापरा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.