नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह
कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन परतलेल्या नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबईमधील लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. रविवारी १६ ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर २० दिवसांसाठी क्वारंटाइन राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण मुंबई महापालिकेने डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा चाचणी केली असता नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना दोन दिवस आधी लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रवी राणा यांना शनिवारी १४ ऑगस्ट तर नवनीत राणा यांना रविवारी १५ ऑगस्टला डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षणं त्यांना जाणवत नव्हती. सोमवारी मुंबई पालिकेच्या डॉक्टरांकडून त्यांची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना १५ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.