शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (15:02 IST)

मुंबईत :सलग दुसऱया आठवडय़ात पाच हजारांवर सक्रिय रुग्णांची संख्या कमी, अशी बोलते आकडेवारी

सलग दुसऱया आठवडय़ात पाच हजारांवर सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 26 जून रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 727 इतकी होती. 4 जुलै रोजी हा आकडा 9 हजार 710 वर तर 11 जुलै रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 595 ने कमी होऊन 4 हजार 115 वर आली आहे.
 
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर एप्रिलअखेर पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली होती. मे महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केल्याने पालिका आणि राज्य सरकारचेही टेन्शन वाढले होते, मात्र जूनमध्ये रुग्णसंख्येला पुन्हा एकदा उतरती लागली असून रुग्णसंख्या पाचशेहून कमी नोंद होत आहे. विशेष म्हणजे दररोज दहा हजारांहून जास्त चाचण्या होत असताना बाधितांची संख्या घटत आहे. मुंबईत 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यामुळे कोरोना पूर्ण आटोक्यात आला असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे, मात्र यामुळे मुंबईसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
 
मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड
 
आतापर्यंतचे सक्रिय रुग्ण – 11,18,396
कोरोनावर मात केलेल्यांची संख्या – 10,94,657
कोरोनामुळे झालेले मृत्यू – 19,624
सद्यस्थितीमधील सक्रिय – 4,115
लक्षणे असलेले बाधित – 1,010
लक्षणे नसलेले बाधित – 3,086