शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2020 (08:16 IST)

या देशात एक राज्य असं आहे ज्यात गेल्या चार दिवसांत एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही

देशात एक राज्य असं आहे ज्या राज्यात गेल्या चार दिवसांत एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. हे राज्य आहे उत्तराखंड. या राज्यात चार दिवसांपूर्वी करोना रुग्णांची संख्या ३५ होती.

रविवारी संध्याकाळपर्यंत ही संख्या कायम राहिली आहे. गेल्या चार दिवसांत एकही करोना संशयित येथे पॉझिटिव्ह आढळला नसल्याची माहिती उत्तराखंडच्या आरोग्य खात्याने दिली आहे. उत्तराखंडमध्ये रविवारी ९३ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.