1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (22:39 IST)

आता जळगावातही जनता कर्फ्यू सुरू

CORONAVIRUS  public curfew has started in Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil. MAHARASHTRA NEWS CORONAVIRUS
कोरोनाचा उद्रेग महाराष्ट्रात वाढतच आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला बघून जळगावातही तीन दिवसासाठी जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे.हा जनता कर्फ्यू  येत्या  शुक्रवार,शनिवार आणि रविवार असा तीन दिवसीय असणार. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी हा निर्णय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे असे सांगितले.

जळगावमध्ये 11 मार्च शुक्रवार रात्री आठ वाजेपासून  सुरू होऊन 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजता संपणार आहे दरम्यान आपत्कालीन सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन राऊत यांनी केले आहे. या काळात सर्व दुकाने,बाजार धार्मिक स्थळे आणि शाळा कालेज, सर्व काही बंद राहील. 

या शिवाय वैद्यकीय सेवा,बस,रेलवे,विमान सेवा कोविड लसीकरण केंद्रे, पूर्वनियोजित परीक्षा असणारी शाळा, बँक,वित्तीय संस्था, कुरियर सेवा सुरू राहील. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी  पेट्रोल डिझेल मिळेल. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती निम्मी असावी.

जनता कर्फ्यू मध्ये ज्यांना सवलत मिळाली आहे त्यांनी आपल्या जवळ ओळखपत्रे बाळगावी असे निर्देश देण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी असे कठोर पाउलं घ्यावेच लागतील आणि जनता कर्फ्यू लावावा लागणार असे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. या बाबतीत नागरिकांनी पुरेपूर सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहेत.