1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (10:52 IST)

अफगाणिस्तानातून परतलेल्या 78 लोकांपैकी 16 कोरोना संक्रमित

Of the 78 people who returned from Afghanistan
नवी दिल्ली.अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या संकटानंतर,तेथून बचाव केल्यानंतर भारतात आणलेल्या 78 पैकी 16 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे यामध्ये गुरु ग्रंथ साहिब आणणाऱ्या तीन ग्रंथकारांचा समावेश आहे.
 
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे देखील या लोकांना भेटले.सर्व 78 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.यासह,काबूल विमानतळ सोडल्यानंतर लोक पोहोचलेल्या सर्व देशांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.
 
 भारताने मंगळवारी दुशांबेमधून 78 लोकांना परत आणले होते, ज्यात 25 भारतीय नागरिक आणि अनेक अफगाणिस्तान शीख आणि हिंदू यांचा समावेश होता.एअर इंडियाच्या विमानाने दुशांबे हून दिल्लीला आणलेल्या लोकांसह सोबत गुरु ग्रंथ साहिबच्या तीन प्रती देखील आहेत.केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि व्ही मुरलीधरन यांनी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरु ग्रंथ साहिबच्या प्रती स्वीकारल्या.
 
हरदीप पुरी यांनी ट्विट केले होते की काही काळापूर्वी श्री गुरु ग्रंथ साहिब जीचे तीन पवित्र स्वरूप काबूलहून दिल्लीला आणण्यात आले होते.त्यांचे स्वागत केल्याने धन्य झालो.
 
मुरलीधरन यांनी ट्विट केले होते की, मंत्री हरदीप सिंह पुरी जी यांच्यासह अफगाणिस्तानातून लोकांसोबत आणलेल्या श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांचे स्वागत केले.