शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (08:01 IST)

राज्यात रविवारी १ हजार ७१५ नवीन करोनाबाधित आढळले

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आज पूर्णपणे ओसरताना दिसत आहे.  करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. करोनाबाधित रूग्णांची दररोजच्या मृत्यू संख्या देखील घटली आहे. राज्यात रविवारी  १ हजार ७१५ नवीन करोनाबाधित आढळले असून, २ हजार ६८० रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, २९ करोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झालेला आहे.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१९,६७८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.३९ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,९१,६९७ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३९,७८९ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१०,२०,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९१,६९७(१०.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२०,४७४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण २८,६३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.