1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 26 एप्रिल 2020 (11:33 IST)

पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ : प्रत्येक जण आपल्या सामर्थ्य ओळखून लढा देत आहे

PM Modis
मास्क म्हणजे आजारपणा नाही, मी तर गमछा वापरण्याचा सल्ला देतो, मास्क हे सभ्य समाजाचं लक्षण आहे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे दुष्परिणामही समजत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
कोरोना संकटात भारताने इतर देशांना औषधं दिली नसती, तर कोणी दोष दिला नसता, मात्र आपण प्रकृती-विकृती न मानता संस्कृतीचं दर्शन घडवलं आणि औषधांची मदत पोहोचवली, भारताच्या आयुर्वेद आणि योग यांची चर्चा देशभरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
कोरोना संकटात भारताने इतर देशांना औषधं दिली नसती, तर कोणी दोष दिला नसता, मात्र आपण प्रकृती-विकृती न मानता संस्कृतीचं दर्शन घडवलं आणि औषधांची मदत पोहोचवली, भारताच्या आयुर्वेद आणि योग यांची चर्चा देशभरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
पोलिस, सफाई कर्मचारी यांच्याविषयी जनतेचा दृष्टीकोन बदलला आहे, पोलीस गरजूंना अन्न आणि औषध देत आहेत, यामुळे पोलिसांशी भावनिक नातं जोडलं आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
डॉक्टर, नर्स, निमवैद्यकीय क्षेत्र अशा कोविड वॉरिअर्सवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करण्यासाठी अध्यादेश आणला : पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अनेकांच्या खात्यात थेट रक्कम जमा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
केंद्र आणि राज्य सरकार यांचा प्रत्येक विभाग एकत्र येऊन काम करत आहे, नागरी उड्डाण आणि रेल्वे विभागातील कर्मचारी सहभागी, 500 टन वैद्यकीय साहित्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
http://covidwarriors.gov.in या माध्यमातून सव्वा कोटी डॉक्टर, नर्स, प्रशासन, आशा सेविका असे अनेक कोविड19 लढवय्ये एकत्र जोडले गेले आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
तुमच्या हृदयातील भावना कोरोनाविरोधातील लढाईला बळ देत आहेत, कोणी मास्क बनवतं, कोणी सबसिडी सोडत आहे, कोणी पेन्शन तर कोणी पुरस्काराची रक्कम पीएम निधीला देत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
भारतातील कोरोनाविरोधातील लढा हा जनताकेंद्री, देशात महायज्ञ सुरु असल्याची स्थिती, प्रत्येक जण आपल्या सामर्थ्य ओळखून लढा देत आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी