गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (08:43 IST)

देशाला संबोधित करणार पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा जनतेला संबोधित करणार आहेत. आज सकाळी 9 वाजता ते जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी काहीतरी महत्त्वाच्या सूचना देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आता मोदी (PM Narendra Modi) काय म्हणतील याकडे लागलं आहे.

 भारतामध्येही करोनाग्रस्तांची संख्या वाढत असून हा आकडा आता दोन हजारहून अधिक झाला आहे. त्यामुळेच सर्वच राज्यांनी उपाययोजना आणखी कठोर केल्या आहेत. तसेच जगभरात करोना विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या १० लाखांजवळ पोहचली. युरोप या महासाथीमुळे हादरला असून, यापुढील काळ आमच्यासाठी ‘भयानक’ राहील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर अमेरिकेने त्यासाठी तयारी सुरू केली आहे.