रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (08:39 IST)

कोरोना लसीकरणाची अशी सुरु आहे तयारी, मेसेज आला की लस घेण्यासाठी जायचे

राज्यात कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाची जोरदार पूर्व तयारी सुरु झाली आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाईल. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 
लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले ५० वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जाते आहे असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
 
“१८ हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्यासंबंधीचा मेसेज संबंधित व्यक्तीला येईल तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार अशा प्रकारचं मायक्रो प्लानिंग सुरु असल्या”चं टोपे यांनी सांगितलं.