रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (08:51 IST)

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, राज्यात गुरुवारी 46 हजार 197 नवीन रुग्णांची नोंद

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.  त्यातच राज्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत.  बुधवारच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ तर, मृत्यू दरात घट झालेला पाहायला मिळत आहे. राज्यात  गुरुवारी 46 हजार 197 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.तर आज 24 तासात 52 हजार 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52% एवढे झाले आहे.राज्यात  एकूण 2 लाख 64 हजार 708 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
राज्यात  37 कोरोना मृतांची नोंद झाल्याने मृत्यूदर 1.92 टक्क्यांवर पोहचला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 73 लाख 71 हजार 757 झाली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण 69 लाख 67 हजार 432 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.राज्यात 24 लाख 21 हजार 501 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3,391 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय राज्यात आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 27 लाख 45 हजार 348 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 73 लाख 71 हजार 757 (10.13 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.राज्यात एकूण 2 लाख 58 हजार 569 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
राज्यात 125 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 87 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने, 38 रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत.आजपर्यंत राज्यात एकूण 2 हजार 199 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.