गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शनिवार, 28 मार्च 2020 (07:23 IST)

वाचा, यामुळे झाला पंतप्रधानांना करोना

ब्रिटनसारख्या प्रगत देशातील पंतप्रधानांना करोनाचा संसर्ग कसा झाला असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मात्र आता बोरिस यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीचा त्यांच्या पत्रकार परिषदेमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका करोनाग्रस्त रुग्णाशी हस्तांदोलन केल्याने आपल्याला करोना झाला आहे, अशी शक्यता बोरिस यांनी बोलून दाखवली. “मला लोकांशी हस्तांदोलन करण्याची सवय आहे. मी अनेकांशी हात मिळवतो. काल रात्र मी एका रुग्णालयाला भेट दिली. तेव्हा तेथील काही रुग्णांशी मी हस्तांदोलन केलं. त्यापैकी काहीजण करोनाचे रुग्ण होते,” असं बोरिस यांनी सांगितलं होते. त्यामुळे हे असं हस्तांदोलन केल्यानेच बोरिस यांना करोना झाल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. बोरिस यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी करोनाग्रस्तांशी हस्तांदोलन केल्याची कबुली देणारा  व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.